आदिवासी सहस्र सेवा समिती या संस्थे मार्फत
दि.11/09/2024 रोजी संस्थेचे सदस्या सोनल वनशा दुमाडा वाढदिवसा निमित्त जि . प. शाळा डोंगरी विल्हातपाडा येथील कब्बडी चे खेळाडूंना आणि गावातील ग्रामस्थांना T-shirt वाटप करण्यात आले आणि जि . प. शाळा डोंगरी विल्हातपाडा इथ वृक्ष रोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्तावना संस्थेचे सहसचिव बबलू त्रिवेदी यांनी संस्थेची तीन वर्ष पूर्ण झाले या तीन वर्षात संस्थेनी केलेली कार्य क्रिडास्पर्था, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिला दिन , वृक्ष रोपण जातीचे दाखले अशी भरीव काम केली . पी. आय. मुतडक साहेबांनी संस्थेनी केलेली भरीव कामाची प्रस्तुशा केली तसेच पुढील कार्यास अशीच कार्य करावी अशी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या . इमामी कंपनी चे मॅनेजर सय्यद साहेबांनी शाळेतील मुलांना शैक्षणिक क्षेत्रात अशीच प्रगती करावी अशी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष वनशा दुमाडा साहेब या वर्षी सामुदायिक लग्न , जातीचे दाखले, शैक्षणिक क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम करणार असल्याचे माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तलासरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक माननिय मुतडक साहेब , एमामी कंपनी चे मॅनेजर माननिय सय्यद साहेब , आदिवासी सहस्र सेवा समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वनशा दुमाडा साहेब , उपाध्यक्ष कॅप्टन विजेंद्र शिंग , संस्थेचे सचिव वनिता दुमाडा , सहसचिव बबलू त्रिवेदी, संस्थेचे सदस्य भानशा फरले , सोनल दुमाडा, तानाजी दुमाडा, पिनेल पटेल इंडिया हाय लाईट चे पत्रकार, मिंटू जैशवाल तपवन चे पत्रकार, हिरेन सोनावडे, शांतीलाल चव्हाण , बजरंग शाहा , सचिन शिंग , सुरेश पासारे, संदेश दुमाडा तसेच गावातील सामाजिक जान असणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

