[ad_1]
Abhijeet Bichukale Anand Dave Kasba Bypoll Results : कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला (Kasba Bypoll Results) आज सकाळी सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आघाडीवर असून त्यांच्या आघाडीपेक्षा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांची चर्चा जास्त रंगली आहे.
अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून (Kasba Bypoll Results) आतापर्यंत सोळा फेऱ्यांत 13 मतं मिळाली आहेत. तर आनंद दवे यांना 121 मतं मिळाली आहेत. अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतांनी चांगलीच रंगत आणली आहे. दोघांच्याही मतांची आकडेवारी अत्यंत निराशाजनक आहे.
अभिजीत बिचुकलेचा मोठा चाहतावर्ग असूनही पहिल्या फेरीत त्याला फक्त 4 मतं मिळाली होती. तर दुसरीकडे ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा आहे असा दावा करणाऱ्या आनंद दवे यांना 12 मतं मिळाली होती. अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांच्यापेक्षा यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला अधिक मतं पडली आहेत.
अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात
‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकलेने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कसबा मतदारसंघातून अभिजीत बिचुकले उभा राहिल्याने ही निवडणूक खूपच रंजक होत चालली आहे. दवे आणि बिचुकले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून बिचुकले चर्चेत आहे. कसबा हा बिचुकलेचा मतदारसंघ नसतानाही त्याने आपल्या खास शैलीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
संबंधित बातम्या
संबंधित बातम्या
[ad_2]Source link

